---Advertisement---
जळगाव,: तालुक्यातील लमांजन गावात एका १९ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्विनी गणेश पाटील असे मृत विवाहितेचे नाव असून, ही घटना सोमवारी (१४ जुलै ) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
अश्विनी ही पती गणेश पाटील व सासूसोबत लांमजन येथे वास्तव्याला होती. तिचे पती एका खासगी कंपनीत कामगार आहेत. सोमवारी दुपारी तिची सासू शेतातील काम आटोपून घरी परतली असता दरवाजा उघडत नव्हता. तिने खिडकीतून पाहिले असता अश्विनीने साडीने गळफास घेतल्याचे लक्षात आले.
---Advertisement---
तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. अश्विनीच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी कुटुंबीयांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे.