जळगाव : गर्दीचा गैरफायदा उचलत एका भामट्याने एस.टी. बस मध्ये चढणाऱ्या शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबविण्याची घटना शनिवारी घडली. हा याप्रकार शहरातील टॉवर चौकाजवळील बस स्टॉप येथे उघड झाला.
नरेंद्र युवराज पाटील (रा. डांभुर्णी, ता.यावल) हे शेतीकारून आपला उदरनिर्वाह करतात. ते शनिवारी, त्यांना जळगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यांना कांदा विक्रीतून 22 हजार 200 रुपये इतकी रक्कम मिळाली होती. ही रक्कम घेऊन ते टॉवर चौकात बसच्या प्रतिक्षेत थांबले होते.
त्यांची बस आल्यानंतर ते दरवाजातून चढत असताना प्रवाश्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीतून शेतकरी बसमध्ये चढत असताना भामट्याने ही रोकड चोरुन नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बस शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. बसची तपासणी केली असता रोकड मिळाली नाही. त्यानंतर बस मार्गस्थ करण्यात आली. या प्रकरणी शेतकर्याने शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बसस्टॉप परिसरात सीसीटीव्हीचा शोध घेऊन फुटेज प्राप्त करण्याच्या तपासाला गती दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.