होर्मुझच्या सुरक्षेसाठी एकवटले ३० देश, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम, सैन्य तैनातीवर चर्चा

---Advertisement---

 

लंडन : होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर इराणकडून शस्त्रासारखा केला जात असून, यामुळे जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमेरिकेची नाकाबंदी आणि इराणनेही हा मार्ग बंद केल्याने अनेक देश मोठ्या ऊर्जा संकटांचा सामना करताना दिसत आहेत. हा मार्ग आता पुन्हा सुरू करण्यासाठी ब्रिटन फ्रान्सच्या नेतृत्वात ३० देश एकवटले आहे. लंडनमध्ये या देशांच्या लष्करी नियोजकांची महत्त्वाची बैठक होणार असून, यात होर्मुझमध्ये सैन्य तैनात करण्यावर चर्चा होणार आहे.

बैठकीचा मुख्य उद्देश होर्मुझमधून होणारी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी ठोस लष्करी रणनीती तयार करणे हा आहे. यासंदर्भात बोलताना ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली म्हणाले, केवळ राजनैतिक सहमतीच पुरेशी नाही, तर तिचे प्रत्यक्ष संयुक्त नियोजनात रूपांतर होणेही आवश्यक आहे. या बैठकीत लष्करी क्षमता, कमांड आणि कंट्रोल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच सैनिकांच्या तैनातीवर सविस्तर चर्चा होणार आहे. गेल्या आठवड्यात युरोप, आशिया आणि मध्यपूर्वेतील सुमारे ५० देशांची बैठक पार पडली. यानंतरच या योजनेला गती मिळाली. या बैठकीत ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, इटली, नेरदलँड, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड, डेनमार्क, पोलंड, बेल्जियम आणि आखाती देशांसह अनेक देश सहभागी होणार आहे. ३० देशांच्या यादीत भारताचा आणि पाकिस्तानचा समावेश असेल की नाही, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---