‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’त ३२ जागा उपलब्ध; दरमहा मिळणार ‘इतके’ विद्यावेतन

---Advertisement---

 

जळगाव — केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान‘इंटर्नशिप योजने’अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या फेरीत एकूण ३२ इंटर्नशिप संधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. तसेच रुजू झाल्यानंतर ६,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये या संधी उपलब्ध आहेत. विप्रो इंटरप्रायझेस येथे सेफ्टीसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी १ जागा, अभियांत्रिकी (IT) क्षेत्रासाठी ५ जागा, प्रोडक्शन क्षेत्रासाठी १५ जागा, तर एचआरसाठी पदवीधरांसाठी १ जागा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सेल्स अँड मार्केटिंगसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ९ जागा उपलब्ध आहेत. तसेच अशोका बिल्डकॉन लिमिटेडमध्ये एचआर पदासाठी पदवीधर उमेदवारांसाठी १ जागा आहे.
या योजनेमुळे तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून आर्थिक सहाय्यही मिळणार आहे, त्यामुळे ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in⁠� या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---