---Advertisement---
राज्यात गेल्या वर्षभरात एकूण ६० हजार ३९१ महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांच्या तपासात ४६ हजार ८७६ महिला तसेच मुली मिळुन आल्या किंवा परत आल्या आहेत. अजुनही १३ हजार ५५१ बेपत्ता आहेत, सरकारच्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
२०२४ तसेच २०२५ या दोन वर्षात एकूण १ लाख १७ हजार २६९ महिला तसेच युवती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी पोलिओस तपासात ८६ हजार २२८ मुली मिळुन आल्या अथवा परत आल्या. या दोन वर्षात ३१ हजार १४१२२ महिला व मुली अद्यापही सापडल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती या लेखी उत्तरातून समोर आली आहे.
राज्यात विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर, तसेच छत्रपती संभाजीनगर येथुन अल्पवयीन मुली तसेच महिला बेपत्ता झाल्यासंदर्भात आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनीषा चौधरी यांच्यासह ३५ आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गृहविभागाची माहिती लेखी स्वरुपात मांडली.
या माहितीनुसार राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर २०२४ या वर्षात ही संख्या ४५ हजार ६६२ होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही मोठी आहे. २०२५ मध्ये १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि २०२४ मध्ये ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. हरवलेल्या एकूण महिलापैकी २०२४ या वर्षात ३० हजार ८७७ तसेच २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळुन आल्याची माहितीतून सांगण्यात आले.
राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यात एकूण ४ हजार ९८९ बालके हरविल्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी तपासात ४ हजार ८१३ बालके मिळुन आली. दोन वर्षात १४ ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुला, मुलीपैकी ९६ टक्केपेक्षा जास्त मुले व मुली मिळून आल्याचे लेखी उत्तरात नमुद केले आहे.









