---Advertisement---
Viral News : पती पोलिसांसह आल्याची कुणकुण लागताच प्रियकरासोबत असलेल्या एका महिलेने थेट छतावरून उडी मारली. महिलेच्या पतीने पोलिसांसोबत तिला रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने थेट छतावरून उडी मारून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पोलीस सूत्रानुसार, या महिलेचे तिच्या पतीसोबत वारंवार वाद होत होते. हा वाद मिटवण्यासाठी एसपी कार्यालयातील महिला सेलने पती-पत्नीला अनेक वेळा समुपदेशनासाठी बोलावले होते. महिला सेलकडून मध्यस्थी केल्यानंतर ती तिसऱ्यांदा घरी परतताना, महिलेने प्रियकरासोबत दुचाकीवर बसून पळ काढला. दरम्यान, पतीला ती हॉलिडे हॉटेलमध्ये असल्याचे लक्षात येताच, त्याने डायल ११२ वरून पोलिसांना घटनास्थळी बोलावले.
पोलिस हॉटेलमध्ये पोहोचताच, महिलेने घाबरून पकडले जाण्याच्या भीतीने हॉटेलच्या सुमारे १२-१३ फूट उंच छतावरून उडी मारली. यानंतर ती घटनास्थळावरून पळून गेली. एका वाटसरूने महिलेच्या उडी मारण्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत येथे ही घटना घडली असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.