सागरी मार्गांच्या सुरक्षेत तडजोड केली जाणार नाही, ब्रिक्स परिषदेच्या बैठकीत भारताची भूमिका

---Advertisement---

 

नवी दिल्ली : होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र यांसारख्या सागरी मार्गाची सुरक्षा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जलमार्गातील सुरक्षेत कोणतीही तडजोड करताना येणार नाही. संवाद आणि मुत्सद्देगिरीने समस्येवर तोडगा काढणे हाच एकमेव मार्ग असल्याचे ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना एस. जयशंकर यांनी सांगितले, दहशतवादावर शून्य सहनशीलतेच्या धोरणाचे समर्थन करण्याची साद त्यांनी उपस्थित सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी घातली.

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले, पश्चिम आशियातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिला नसून त्याचे पडसाद जागतिक व्यापारावर उमटत आहेत. जलमार्गातील तणाव सर्व देशांसाठी चिंतेचा विषय असून, तेथील सुरक्षेवर कोणतीही तडजोड करता येणार नाही. कोणत्याही संघर्षावर संवाद आणि मुत्सद्देगिरी हेच एकमेव शाश्वत उपाय आहेत.

सर्व जलमार्गामधून सुरक्षित नौकानयन आवश्यक आहे. या मार्गांमध्ये कोणताही अडथळा आल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे, सर्व सागरी मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सर्व देशांची सामूहिक जबाबदारी आहे. सागरी मार्गावरील
जहाज वाहतुकीला असलेला धोका सातत्याने वाढत आहे आणि ऊर्जा व तेल पुरवठा पायाभूत सुविधांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत पूर्ण पाठिंबा देईल.

आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हावे

जयशंकर यांनी सांगितले की, संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेश सध्या अत्यंत चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे, नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील हल्ले रोखणे महत्त्वाचे आहे. दहशतवादावर भारताची भूमिका अखोरेखित करताना ते म्हणाले, सीमापार दहशतवाद सर्व जागतिक नियमांचे उल्लंघन करतो आणि जागतिक शांतता व सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि त्याचे समर्थन करण्यासाठी कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही. सर्व ब्रिक्स देशांनी दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

अराघची यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा

जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती, त्याचे जागतिक परिणाम आणि द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. एक्सवरील पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती देताना जयशंकर म्हणाले, इराणी समकक्षांसोबत दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---