बापरे: सोन्या-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण; सोने, चांदी इतक्या हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर काय?

---Advertisement---

 

गेल्या दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या भावात तब्बल ३ हजार ५०० रुपयांची घट झाली असून चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

सोन्या चांदीच्या आजच्या घसरणीनंतर सोन्याचे दर १ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६२ हजार २२५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाले असून चांदी सध्या २ लाख ६६ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ७३ हजार ९८० रुपयांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, गुंतवणूकदारांकडून होत असलेली नफावसुली तसेच मागणीत झालेला बदल यामुळे सराफा बाजारात ही मोठी घसरण झाल्याचे मानले जात आहे.

भारतात आयात शुल्क आणि जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे पुढील काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---