थरारक हत्याकांड !नवऱ्याच्या मदतीने गर्लफ्रेंडनेच केला बॉयफ्रेंडचा खून; मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

---Advertisement---

 

मुंब्रा : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोघे फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील रहिवासी अरबाज मकसूद अली खान हा नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी अरबाजच्या कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सोवा परिसरात आढळले. याच परिसरात त्याची गर्लफ्रेंड मेहजबीन शेख हिचेही लोकेशन असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत मेहजबीनने तिचा पती हसन आणि भाऊ तारीक शेख यांच्या मदतीने अरबाजकडून पैसे उकळण्याचा कट रचल्याचे सांगितले.


अरबाजला पैशांच्या व्यवहारासाठी वर्सोवा येथे बोलावण्यात आले होते. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याचे हात-पाय बांधून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरबाजचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबून मुंब्रा परिसरातील एका निर्जन नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारीक शेख यांना अटक केली आहे. तर मेहजबीनचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---