---Advertisement---

रावताळे कुटुंबीयांचा वारेमाप खर्चाला फाटा, मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

---Advertisement---

मुबारकपुर, ता. शहादा : मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट, असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये शिक्षण संस्कृती रुजविण्यासाठी रावताळे कुटुंबीयांनी आडगाव (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक लेखन साहित्य वाटप केले. विशेषतः रावताळे कुटुंबीय गेल्या तीन वर्षांपासून मुलाचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करत असून, यातून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

शहादा तालुक्यातील आडगाव येथील सरपंच जितेश रावताळे व त्यांच्या पत्नी हर्षला रावताळे नेहमीच लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तसेच ते दरवर्षी मुलगा हर्षित याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन साहित्य वाटप करीत असतात.

सालाबादप्रमाणे यंदाही त्यांनी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन साहित्य वाटप केले. विशेषतः गेल्या तीन वर्षांपासून रावताळे दाम्पत्य सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून समाजात सामाजिक बांधिलकी जपत आहे.

यावेळी मुख्याध्यापक दिलीप पावरा, शिक्षक किसन वसावे, धरमसिंग वसावे, वासुदेव पवार, अजय खर्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक दिलीप पावरा यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---