---Advertisement---

वाहनधारकांना मोठा दिलासा…एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ

---Advertisement---


जळगाव : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने मुदतवाढ केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नवीन प्लेट आता बसविता येणार आहे.
२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविणे शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने अनिवार्य केले आहे. त्यासाठी वाहनधारकांना वाहन रजिस्ट्रेशन बुक तसेच आधारकार्ड देऊन ऑनलाईन नोंदणी करता येते. त्यानंतर मिळालेल्या तारखेला शासनमान्य इच्छितस्थळी नंबर टाकून नवीन नंबर प्लेट बसविली जात आहे.

तर दंडात्मक कारवाई

मुदत संपल्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तथापि १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी पुढील अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.


जनजागृतीचे आवाहन

एचएसआरपी बसविण्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कार्यक्षेत्रात, शहरासह तालुका आणि गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी निर्देशित केले आहे. यासाठी स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन सर्वांना अवगत करावे, असेही त्यांनी शुक्रवारी (२० जून) च्या परिपत्रकात नमूद केले आहे.

अशी मिळाली मुदतवाढ

सुरुवातीला ३१ मार्च २०२५ पर्यंत एचएसआरपी नोंदणी क्रमांक पाटी वाहनांना बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात असल्याने बऱ्याच वाहनधारकांची नोंदणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने परिपत्रकातून ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली. तथापि अनेक जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसविणे अजुनही बाकी आहे. त्यामुळे पुन्हा परिवहन कार्यालयाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---