Jalgaon Crime : दुकानावर जावून मी बिस्कीट घेऊन येतो, असे सांगुन घराबाहेर पडलेल्या तेरा वर्षीय बालकास फूस लावून पळवून नेले. गुरुवारी (१९ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना कानळदा येथे घडली. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता बालक मिळुन आला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (२१ जून) तालुका पोलीस ठाण्यात फूस लावून पळवुन नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काशिराम रुपसिंग बारेला (वय ४५, रा. उमरे ता. भगवानपुरा, म.प्र.हमु कानळदा) हे कुटुंबासह राहतात. त्यांना विकास नावाचा तेरा वर्षाचा मुलगा आहे. गुरुवारी दुपारी मी दुकानावरुन बिस्कीट घेऊन येतो. असे कुटुंबातील सदस्यांना सांगुन तो घराबाहेर पडला परंतू उशिरापर्यंत तो घरी परतला नाही.
कुटुबियांनी कानळदा गावात सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. शनिवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे तपास करीत आहेत. हातावर ‘एन’ गोंदण विकास याची उंची चार फुट पाच इंच असून त्याच्या उजव्या हातावर इंग्रजीत ‘एन’ अक्षर गोंदलेले आहे. त्याला मराठी, हिंदी आणि पावरा भाषा बोलता येतात.