---Advertisement---

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी

---Advertisement---

जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा–रावेर रस्त्यावर एका मोटरसायकलला ट्रॅकने जबर धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतली आहे.

रावेर तालुक्यातील सावदा–रावेर रस्त्यावरील कुंदन हॉटेलजवळ गुरुवारी (२६ जून) रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील हर्षल नारायण सरोदे (वय ४५, रा. मस्कावद सिम, ता. रावेर, जि. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

---Advertisement---

हर्षल सरोदे आणि त्यांचे मित्र हर्षल बाजीराव पाटील (वय ४३, रा. मस्कावद सिम) हे सावद्याहून आपल्या गावी मोटरसायकलने (MH-19-AD-0185) जात होते. दरम्यान, ट्रक (PB-65-BB-9182) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकचालक सतविंदरसिंग अमरजितसिंग (वय ३७, रा. अवानकोट, रुपनगर, जि. रोपड, पंजाब) याने भरधाव वेगाने आणत ट्रक दुचाकीला धडकविला.

या धडकेत हर्षल सरोदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर फिर्यादी हर्षल पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. उमेश पाटील व विजय पोहेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात ट्रकचालक सतविंदरसिंग अमरजितसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---