---Advertisement---
एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा पूर्ववैम नस्यातून खून करण्यात आला, अशी माहिती एलसीबीच्या तपासातून उघडकीस आली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी (२७ जून) पत्रकार परिषदेत सांगितले.
घटनेच्या संदर्भात माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांनी १४ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दशरथ महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी मतभेद होते. याम ळे कल्पना महाजन यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला होता.
---Advertisement---
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी या प्रकरणाचा एलसीबीकडे तपास सोपविला होता. त्यानुसार एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दोन पथके नियुक्त करुन तपासाकामी रवाना केली. घटनास्थळी ये जा करणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याच्या तपासकामी पथक कामाला लागले असता पावसाच्या दिवसात वीजपुरवठा खंडित झाल्याने हे फुटेज प्राप्त करण्यात अडचण निर्माण झाली.
दरम्यान पथकातील हवालदार प्रवीण मांडोळे तसेच राहुल कोळी यांनी एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. सतत आठ तास हे फुटेज त्यांनी तपासले असता संशयित इसमांचा वावर दिसला. त्यानुसार पथकाने उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९), पवन कैलास महाजन (वय २०, सर्व रा. एरंडोल) या संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी या खुनाची कबुली दिली. पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याची माहिती संशयितांनी दिली.
पथकाने संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कार उमेश सुतारकडून जप्त केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, हवालदार हरिलाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवी कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तिघांना कोठडी
तिन्ही संशयितांना शुक्रवारी एरंडोल न्यायालयात पोलिसांनी हजर केले. युक्तीवादाअंती न्यायालयाने तिघांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहेत.