---Advertisement---

फुटेजच्या तपासातून दोन सराईत जेरबंद; पाच मोबाईल जप्त; आरपीएफची कारवाई

---Advertisement---


जळगाव :
जळगाव शहर आणि जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत संशयित आरोपींना रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केलेल्या दोघांकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यात प्रवाश्यांचे तीन मोबाइल नवीन बसस्थानकातून चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. शुक्रवारी (२७ जून) संध्याकाळी ही कारवाई केली.

१७ जून २०२५ रोजी भिकन नवल पाटील या प्रवाशाचा सुमारे १ लाख २९ हजार ९९९ किमतीचा मोबाईल बडनेरा-नाशिक मेमो ट्रेनमध्ये चढताना जळगाव प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चोरीस गेला होता. या प्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले.

---Advertisement---

आरपीएफ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले असता एका संशयित व्यक्तीची ओळख पटवली. २६ जून रोजी त्यावर पाळत ठेवून, मनोज सोनी, शिवपूजन सिंग, पंकज बाघ, विनोद जेठवे आणि मनोज मौर्य यांच्या पथकाने त्या संशयितास त्याच्या एका साथीदारासह ताब्यात घेतले.

बसस्थानकातून चोरले मोबाइल


संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण पाच मोबाईल मिळून आले. याबाबत संशयितांना विचारणा केली असता पाच पैकी तीन मोबाइल नवीन बसस्थानकातून चोरल्याची दोघांनी कबुली दिली. हे मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले. संशयित आरोपी शेख इमरान शेख गुफरान (वय २२, मालेगाव) यास जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुसरा संशयित आरोपी शेख अश्फाक शेख मुस्ताक (वय ३०) यास जीआरपी भुसावळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून त्याला पूर्वी दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा बल पथकाने केली

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---