---Advertisement---
अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षण काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया दुपारी 2 वाजता नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालयात पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी यांचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले असून, त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेनंतर सरपंच पदांपैकी अर्ध्या पदांवर महिलांसाठी (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागासवर्गीय महिला व सर्वसाधारण महिला) आरक्षण निश्चित करण्यात येईल. यासाठी दुसरी सभा त्याच दिवशी दुपारी 4 वाजता घेण्यात येणार आहे.
---Advertisement---
प्रशासनाने अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना या महत्त्वपूर्ण सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आरक्षण प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखण्यासाठी ही उपस्थिती गरजेची आहे, असे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.