---Advertisement---

Jalgaon News : पांडुरंगाचे दर्शन घेऊन आली आई, पण दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून हादरली

---Advertisement---

जळगाव : पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन घरी परतलेल्या आईला आपल्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याची घटनेस सामोरे जावे लागले. ही दुर्दैवी घटना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरात घडली. सचिन उर्फ रामेश्वर लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मी नगर, कानळदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

सचिन हा आईसह लक्ष्मी नगरात वास्तव्याला होता. शहरातील केळकर मार्केट येथे एका कपड्यांच्या दुकानात काम करून तो कुटुंबांचे पालनपोषण करीत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आई आणि तो असे दोघेच राहत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त सचिनची आई ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली होती. तर सचिन घरीच होता.

---Advertisement---

मंगळवारी (८ जुलै) रोजी सकाळी सचिनची आई मंगलाबाई या पंढरपूर येथून घरी जळगाव येथे परतल्या. घरी आल्यावर त्यांनी दरवाजा उघडताच समोर त्यांच्या मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या वेळेला त्यांनी आक्रोश केला. मंगलाबाईचा आक्रोश ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. सचिनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळेला सचिनच्या कुटुंबीयांसह मित्रांनी रुग्णालयात आक्रोश केला. घटनेमुळे लक्ष्मी नगर परिसरात शोककळा पसरली आहे. तर जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---