---Advertisement---

चिंचोली गोळीबारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. रात्री ९ते ९, ३०च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीवर आलेल्या दोघांचा शोध पोलीस घेत असून, घटनास्थळी रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे पाहण्यासाठी दाखल झाले, तर शुक्रवारी डीवायएसपी यांनी पोलीस निरीक्षकांसह धानोरा, किनगावसह मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तपासणी केली तर या घटनेतील जखमी हॉटेलमालकाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

---Advertisement---


चिंचोली येथे आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. या हॉटेलवर गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी वर दोन जण आले होते. त्यापैकी एक जण दुचाकीखाली उतरून हॉटेल बंद करून कारद्वारे किनगाव कडे निघत असलेले हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. चोपडा, हल्ली मुक्काम चंदू अण्णा नगर, जळगाव) हे त्यांच्या कार (क्रमांक एमएच १९ सीएफ ३३५३) मध्ये होते व त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र रतन रमेश वानखेडे (वय ४२, रा. किनगाव खुर्द) हे होते.

तेव्हा दुचाकीच्या खाली उतरून त्यांच्या कारजवळ एक अनोळखी तरुण आला व त्याने सांगितले की, मला बियर पाहिजे आहे. त्याला सांगितले की हॉटेल बंद आहे. तुला जर बियर पाहिजे असेल तर किनगाव येथे जा. तेव्हा अशा बोलण्याच्या रागातून त्या अनोळखी इसमाने आपल्याजवळून एक पिस्तोल काढले आणि प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक त्याच्या छातीत लागली तर एक त्याच्या उजव्या खांद्याजवळ गु लागली आणि गोळी झाडून दोघेही किनगावच्या दिशेने दुचाकीद्वारे फरार झाले. जखमी अवस्थेत बाविस्कर यांना जळगावला दाखल करण्यात आले आहे.
ज 3 प ह व ज प प 3 पि

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---