---Advertisement---

Maharashtra News : महायुती सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर

by team

---Advertisement---

Maharashra News : महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. या बातमीनुसार, राज्यातील अजून एका शहराचे नाव बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील हे शहर आहे. त्यानुसार, आता इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर असे होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा निर्णय घेत तसा प्रस्ताव दिला आहे. या शहराचे नाव बदलण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै ही घोषणा केली. त्यानुसार, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यात येणार आहे.


प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे जाणार


राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले की, मंत्रिमंडळ बैठक गुरुवारी पार पडली. यात इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार, हा प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.

दरम्यान, सपा आमदार रईस शेख आणि काँग्रेस नेते असलम शेख यांच्या प्रतिक्रीया समोर आल्या आहे. यात आमदार रईस शेख म्हणाले, इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करत बदलत आहात. त्या शहराचा विकास करा, नाव बदलल्याने परिस्थिती बदलत नाही.
तर काँग्रेस नेते अस्लम शेख म्हणाले, संभाजीनगर असो किंवा इस्लामपूर. देशात किंवा राज्यात असे अनेक जिल्हे आहेत ज्यांची नावे बदलण्याचे काम काही लोक करत आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर केले, तिथली परिस्थिती काय आहे? तिथे पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या आजही कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---