---Advertisement---

चिंचोली येथील प्रौढाने गळफास घेत संपविले जीवन

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असलेल्या प्रौढाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना गुरुवारी (१७ जुलै) रोजी घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर शिवदास शेळके (वय ४८ रा. चिंचोली ता. जळगाव) असे मयताचे नाव आहे.

ज्ञानेश्वर शेळके हे सेंटिंगचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी (१७ जुलै) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

---Advertisement---

हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ ज्ञानेश्वर शेळके यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---