---Advertisement---

जळगाव एमआयडीसीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : एमआयडीसी व्ही सेक्टरमधील भोसले इंडस्ट्रीजमधून सोया पनीर बनवण्याची मशिनरी, तिचे पार्टस आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ८ तासांत जेरबंद करत यशस्वी सापळा रचला आहे.

एमआयडीसीतील एका कंपनीत चोरी झाल्याबाबत कंपनीचे मालक यांनी सुरेश रामचंद्र पाटील यांनी मंगळवारी (२२ जुलै ) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्ह्याची उकल करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

---Advertisement---

गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ गिरीश पाटील, पोकों राहुल रगडे, पोकों विशाल कोळी यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित इसम फिरताना दिसले. पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे आणि विशाल कोळी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून त्यांची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले.

संशयीत आरोपींची सखोल चौकशी केली असता, प्रशांत उर्फ बाप्या पंडितराव साबळे आणि नितीन उर्फ मित्या रोहिदास चव्हाण (दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना दिनांक २२ जुलै रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजय मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मंदार महाजन हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment