---Advertisement---
---Advertisement---
जळगाव :कौटुंबिक वादातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. त्याने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव हेमंत अरुण पाटील (वय ३०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) असे आहे.
ही घटना शुक्रवारी (२६ जुलै ) रोजी दुपारच्या सुमारास पाळधी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---Advertisement---
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे राहणारा हेमंत पाटील हा गुजरात राज्यातील भरुच येथील कंपनीत नोकरीला होता. कौटुंबिक वादामुळे तो गेल्या महिन्यांपासून विवंचनेत होता. त्यातूनच शुक्रवार दि. २५ रोजी हेमंत पाटील यांनी पाळधी रेल्वे स्थानक जवळ धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली, घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.