---Advertisement---
जळगाव : सोने-चांदीच्या भावात दिवसागणिक वाढ कायम असून, चांदीच्या भावात पुन्हा सहा हजार रुपयांची वाढ होऊन, ती आता किलोसाठी दोन लाख ५३ हजार रुपयांवर पोहचली आहे तर सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते १० ग्रॅमसाठी १ लाख ४० हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे.
विशेषतः गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. २६ रोजी १० हजार ५०० रुपये व २७ रोजी १४ हजार ५०० अशी दोन दिवसात एकूण २५ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी २ लाख ४७ हजार रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर आता पुन्हा सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे.
मागणी वाढली असताना चांदीचा तुटवडा असल्याने भाव अधिक वाढत आहेत. सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते १० ग्रॅमसाठी १ लाख ४० हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४१,३६०
२२ कॅरेट – ₹१,२९,५९०
१८ कॅरेट – ₹१,०६,०६०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४१,२१०
२२ कॅरेट – ₹१,२९,४४०
१८ कॅरेट – ₹१,०५,९१०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४२,०४०
२२ कॅरेट – ₹१,३०,२००
१८ कॅरेट – ₹१,०८,६५०
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४१,७१०
२२ कॅरेट – ₹१,२९,९०० रुपये.
१८ कॅरेट – रु. १,०६,२८०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४१,२६० रुपये
२२ कॅरेट – १,२९,४९० रुपये
१८ कॅरेट – १,०५,९६० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४१,३६० रुपये
२२ कॅरेट – १,२९,५९० रुपये
१८ कॅरेट – १,०६,०६० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४१,७६० रुपये
२२ कॅरेट – १,२९,९५० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०६,३३०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४१,७१०
२२ कॅरेट – ₹१,२९,९००
१८ कॅरेट – ₹१,०६,२८०









