---Advertisement---
पारोळा येथील बायपास रोडवर दिनांक १६ जून रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बजाज प्लेटिना मोटरसायकलवरील अनोळखी चालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
पारोळा बायपास रोडवर बजाज प्लेटिना (क्रमांक MH 18 BJ 5888) आणि अशोक लेलँड कंपनीचे वाहन (क्रमांक GJ 36 V 7032) यांच्यात हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, प्लेटिना चालकाचा यात जागीच मृत्यू झाला. मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, मयताच्या हातावर संगीता अनिल असे नाव गोंदलेले आढळले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदर वाहने किंवा हातावरील नावावरून या अनोळखी मयत इसमाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास, अथवा ओळख पटल्यास तातडीने पारोळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.









