जळगावमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश, पोलीस पथकाच्या छाप्यात दोन परप्रांतीयांसह चार महिलांची सुटका….!

---Advertisement---

 

जळगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जळगाव शहरात सोमवार दिनांक १९ जानेवारी रोजी एक मोठी कारवाई केल्याचं उघडकीस आलंय, जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध देहव्यापाऱ्याच्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकत देहविक्री करणाऱ्या चार महिलांची सुटका केलेली आहे, यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील तसेच गुजरात राज्यातील सुरत येथील दोन महिलांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे, यासह देह व्यापार चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंट्स ना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रकार उघड….!

जळगाव शहरातील रामानंद नगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध देह व्यापार सुरू असल्याचं थानिक नागरिकांना समजलं आणि त्यांनतर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या प्रकाराबाबत तक्रार केली, व या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार करत सापळा रचला व कारवाईचे नियोजन केले.

पोलिसांनी डमी ग्राहक तयार करून उघडकीस आणला संबंधित प्रकार….!

जळगाव शहरातल्या रामानंद नगर भागात या अवैध देहव्यापाऱ्याच्या प्रकाराला उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार केला व संबंधित डमी ग्राहकाला पैसे देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, त्यानुसार तेथे गेला व डमी ग्राहकाने या व्यवहाराची खात्री केली आणि खात्री झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ‘मिस कॉल’ चा इशारा देऊन कळविले, आणि त्याच क्षणाला संबंधित घरावर नजर ठेवून असलेल्या पोलिसांनी छापा टाकला. आणि यात देहविक्री करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली सोबतच देह व्यापार चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंटस ना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या पोलिसांच्या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह आवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार, रतनहरी गीते, रवींद्र मोतीराया, आणि काही पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होत, पोलिसांच्या या कामगिरीबाबत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---