खड्ड्यांमुळे अपघात झाला तर मनपा देणार भरपाई ; जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा….

---Advertisement---

 

जळगाव शहरात खड्डेमय रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत होते अखेर महापालिकेने या खड्ड्यांबाबत मोठा निर्णय घेतला असून महानगरपालिका हद्दीत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांचा अपघात होऊन दुखापत झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित नागरिक व त्याच्या नातेवाईकांना जळगाव महानगरपालिकाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर हा महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला आहे त्यानुसार जळगाव महापालिकेने नुकसान भरपाई बाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र नुकसान भरपाई धारकांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करणे महत्त्वाचं आहे. सदर अर्ज हा महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागात करावा लागणार आहे.

यात घडलेल्या अपघाताची माहिती, वैद्यकीय अहवाल, पोलीस पंचनामा आणि मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र यासह सर्व पुराव्यांचे तपासणी केली जाणार आहे याकरिता महानगरपालिका कडून समिती देखील गठीत करण्यात आली असून विशिष्ट अर्जांवर समितीच्या शिफारसीनंतरच नुकसान भरपाई ही मंजूर केली जाणार आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रस्त्यांच्या देखरेखीबाबत जळगाव महानगरपालिकेची जबाबदारी अधिक वाढली असून खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या जळगावकर नागरिकांना त्यामुळे मात्र मोठा दिलासा मिळालेला आहे. पात्र नुकसान भरपाई धारकांनी लागणाऱ्या कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी केले आहे. यासोबतच जळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्या सोबतच नुकसान भरपाईची जबाबदारी ही आता जळगाव महापालिकेवर आल्याने त्याचा फायदा थेट सर्वसामान्य जळगावकर नागरिकांना होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---