सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळले; १० जवानांचा दुर्दैवी मृत्यू

---Advertisement---

 

भारतीय सैन्याला मोठा धक्का बसला आहे. सैन्याचे कॅस्पर वाहन खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत १० जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याचे हे वाहन नियमित गस्तीदरम्यान डोंगराळ भागातून जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन थेट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच अनेक जवानांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, या घटनेबाबत लष्कराने शोक व्यक्त केला असून मृत जवानांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाड किंवा रस्त्यावरील घसरण हे संभाव्य कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---