---Advertisement---
सोनं दीड लाखांच्या पुढे, चांदी सव्वा तीन लाखांवर ; भाव आणखी किती वाढणार ?
सोनं आणि चांदी… एकेकाळी दागिन्यापुरतं मर्यादित असलेलं हे मौल्यवान धातू आज सर्वसामान्यांपासून उद्योगजगतापर्यंत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. “सोनं अजून किती वाढणार?” हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. लग्न पहावं करून, घर पाहावं बांधून… आणि आता सोनं पाहावं, खरेदी करून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सोन्याने थेट दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोन्याचे दर सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत.
1. प्रति तोळा सोनं – 1 लाख 55 हजार 428 रुपये
2. एक किलो चांदी – 3 लाख 18 हजार 960 रुपये
अवघ्या एका दिवसातच चांदीत 19 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी चांदीचा दर 2 लाख 99 हजारांवर होता, तर शुक्रवारी थेट 3 लाखांच्या पुढे झेप घेतली. 2026 च्या पहिल्याच 23 दिवसांत मोठी उसळी गवतली असून सोनं तब्बल 22,233 रुपयांनी महागलं चांदी 88,450 रुपयांनी महागली. गेल्या वर्षीची तुलना केली तर चित्र आणखी धक्कादायक आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे भाव :
सोनं : 76,162 रुपये प्रति तोळा
चांदी : 86,017 रुपये प्रति किलो
मागच्या वर्षी 31 डिसेंबर 2025 रोजी :
सोनं : 1,33,195 रुपये
चांदी : 2,30,420 रुपये
एकंदरीत एका वर्षातच सोनं 57 हजारांनी, तर चांदी 44 हजारांहून अधिक रुपयांनी महागली आहे. पुढे काय? दर कुठवर जातील? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल…
सोने चांदीच्या दराबाबत तज्ञांचं मत काय ?
तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकन टॅरिफ धोरण आणि मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला, तर 2026 मध्ये सोनं प्रति तोळा 1 लाख 90 हजारांपर्यंत तर चांदी तब्बल 4 लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सोनं-चांदी महागण्यामागची प्रमुख कारणं काय ?
1. युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती
2. महागाई आणि आर्थिक मंदीची भीती
3. RBI व जागतिक बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी
4. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणं
5. अमेरिकन फेडकडून व्याजदर कपात
6. सोन्याच्या खाणकामाचा खर्च आणि मर्यादित पुरवठा
चांदीच्या भावात मात्र झपाट्याने वाढ झाली..
चांदी केवळ मौल्यवान धातू नाही, तर उद्योगांसाठी अत्यावश्यक घटक आहे. सोलर पॅनेल्स, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल उद्योगामुळे चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे.









