---Advertisement---
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचा राहत्या घरी आत्महत्या केल्यानी घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत मुलीचे नाव प्रांजल रमेश ठाकूर (वय 16) असे असून, ती रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे वास्तव्यास होती. घरात ही घटना लक्षात येताच तिचे वडील रमेश शांताराम ठाकूर यांनी तिला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत. दरम्यान, मुलीच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे रामेश्वर कॉलनीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र पोलीस तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.









