---Advertisement---
ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांची उपस्थिती…
जळगाव मध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर असल्याचे मत यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस दल गृहरक्षक दल तसेच विद्यार्थ्यांच्या एनसीसी पथकाने पथसंचलन करत ध्वजाला मानवंदना दिली तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









