---Advertisement---
ZP Election Postponed : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अर्थात ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ६ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता ७ फेब्रुवारीला मतदान
त्यामुळे आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ६ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.









