---Advertisement---
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात आहे. एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे या दुर्घटनेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे हे प्रश्न उपस्थित करणारे कोणीतरी बाहेरचे नसून, राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच नेते आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर भावनिक पण थेट सवालांची मालिका मांडली आहे. “मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या मनातील शंका शब्दांत मांडल्या आहेत.
अमोल मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सहावी व्यक्ती नेमकी कुठे आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
इतकंच नाही, तर Take-off पूर्वी प्रवासी यादी डिजिटल पद्धतीने नोंदवली जाते, मग त्यामध्ये विसंगती कशी निर्माण झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अपघात इतका भीषण असताना एकही कागदाचा तुकडा जळालेला का आढळला नाही, याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
अमोल मिटकरींची पोस्ट
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!
मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.
प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय –
* अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
* सहावी व्यक्ती कुठे गेली?
* Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
* एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
* एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.
दरम्यान, अमोल मिटकरींच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेभोवतीचे अनेक अनुत्तरित प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.









