मोटारसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक; चार दुचाकी जप्त

---Advertisement---

 

जळगाव : Mehunbare Police Station हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्याचे समजते.
या प्रकरणी भूषण संजय सोनवणे (वय १९, रा. टेंभुर्णी ता. चाळीसगाव) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित मालकांना वाहने परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायककुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास शिरसाठ तसेच पोलीस कर्मचारी मोहन सोनवणे, गणेश सोनवणे, पाना माळी, पती विकास बडगुजर व रोशन पाटील यांचा सहभाग होता.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---