छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील आठवडी बाजार बंद राहणार…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार दर गुरुवारी भरत असतो परंतु या गुरुवारी दि.19/02/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातुन भव्य मिरवणूक व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शहरात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासह व्यापारी यांचे आर्थिक नुकसान होऊ नये व शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या आदेशानुसार दि.19/02/2026 गुरुवार रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

सदर आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दि.20/02/2026 रोजी भरविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी व व्यावसायिक व्यापारी संबंधितांनी याची नोंद घ्यावी. व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे आणि बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन जामनेर नगरपरिषद मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---