---Advertisement---
जळगाव येथे भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले. नवीन आस्थापना मंजूर करणे, वेतनश्रेणीतील सुधारणा तसेच इतर सेवा विषयक मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून, त्याला जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यांत करण्यात येत असून, आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदवला.
मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक रजा तसेच बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
यावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.









