---Advertisement---
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Union Public Service Commission (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) सहाय्यक कमांडंट परीक्षा 2026 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील प्रमुख सुरक्षा दलांमध्ये अधिकारी पदांवर भरती केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत Central Armed Police Forces (CAPF) मधील विविध दलांमध्ये सहाय्यक कमांडंट पदे भरली जातील. पदवीधर उमेदवारांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची संधी मानली जाते.
भरती प्रक्रियेद्वारे खालील दलांमध्ये ३४९ पदे भरली जाणार आहेत:
- सीमा सुरक्षा बल (BSF) -108 पदे
- केंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) – 106पदे
- भारत-तिब्बत सीमा पुलिस (ITBP) – 12 पदे
- सशस्त्र सीमा बल (SSB) – 53 पदे
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) – 70 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. अर्ज फक्त UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वरूनच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती साठी कोण अर्ज करू शकते?
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आवश्यक
- वय २० ते २५ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी नियमांनुसार सूट लागू)
- भारतीय नागरिक असणे आवश्यक UPSC ने निश्चित केलेले शारीरिक व वैद्यकीय निकष पूर्ण करणे बंधनकारक
या भरती साठी किती परीक्षा शुल्क आकारले जाणार ?
- General / OBC – ₹200/-
- SC / ST / महिला उमेदवार – शुल्क नाही
या भरती साठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या
- “नवीन नोंदणी” वर क्लिक करून युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) मिळवा
- लॉग इन करून सामान्य अर्ज फॉर्म (CAF) भरा
- वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा
- परीक्षा केंद्र निवडा व अर्ज शुल्क भरा
- स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि ओळखपत्र तपशील अपलोड करा
- सर्व माहिती पडताळून अर्ज सबमिट करा
CAPF सहाय्यक कमांडंट ही गट-अ (Group A) अधिकारी पदाची भरती असून देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. निवड झालेल्या उमेदवारांना देशाच्या विविध सीमेवर, औद्योगिक सुरक्षेत आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते.
देशसेवेची प्रबळ इच्छा असलेल्या तरुणांसाठी UPSC CAPF 2026 ही सुवर्णसंधी आहे. प्रतिष्ठा, जबाबदारी आणि आव्हानात्मक करिअरची इच्छा असलेल्या उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.









