डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळा, निस्वार्थ सेवेचा हृदयस्पर्शी उत्सव…!

---Advertisement---

 

श्री. चंद्रशेखर जोशी
संपादक, दै. तरुण भारत जळगाव

एकात्मता सहकार्य आणि सामूहिक विचारांचा वसा घेऊन समाजावरच आईसारखे प्रेम करूया…! या दिशेने वाटचाल करणारी संस्था म्हणजे ‘केशवस्मृती प्रतिष्ठान सेवासमूह’ समाजात अनेक संस्था कार्यरत असतात. काही नावासाठी काही कर्तुत्वासाठी मात्र काही संस्था अशा असतात की, त्यांचे कार्य केवळ उपक्रमांपुरतेच मर्यादित राहत नाही. तर ते माणसांच्या जीवनाला स्पर्श करून जाते. केशवस्मृती सेवा समूह ही अशी एक सेवाधर्मी चळवळ होय…. की जेथे सेवेचा अर्थ कागदावरच नव्हे; तर कृतीतून उमटतो.

समाजावर आईसारखे प्रेम करा हा साधा पण जीवनस्पर्शी संदेश देणारे नेतृत्व म्हणजे डॉ. अविनाश आचार्य उपाख्य दादा यांनी या संस्थेचे मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले दादा म्हणजे व्यक्ति-व्यक्ती जोडत एका समूहाच्या माध्यमातून उत्तम कार्य उभे करणारे व्यक्तिमत्व…..आईचे प्रेम निस्वार्थ जिव्हाळाचे आणि सतत देत राहणारे असते. नेमकी हीच भावना या समूहाच्या प्रत्येक प्रकल्पामागे दिसून येते.

आज समूहाच्या माध्यमातून तब्बल 22 सेवाभावी प्रकल्प समाजाच्या विविध स्तरांपर्यंत आशेचा किरण पोचवत आहेत. गरजूंना मदतीचा हात विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ आणि उपेक्षितांना आपलेपण या सर्वांचा संगम म्हणजे केशवस्मृती सेवा समूह या सेवा यज्ञाची मुहूर्तमेढ व आकार डॉक्टर अविनाश आचार्य यांनी दिला तर आज योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर हे करत आहेत. विद्यार्थी परिषद चळवळीतून घडलेले भरत दादा यांची संघटन शक्ती दूरदृष्टी आणि कार्य तत्परता यामुळे या उपक्रमांना व्यापक रूप मिळत चालले आहे. उत्तम सेवेला व्यवस्थापनाची जोड मिळाली आणि उपक्रम अधिक परिणामकारक झाले. त्यामुळेच हा केशव स्मृती सेवा समूह आज केवळ संस्था न राहता समाजाचा विश्वासाचे प्रतीक बनलेले आहे.

या समूहाची आणखी एक उल्लेखनीय परंपरा म्हणजे सेवा क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी केला जाणारा गौरव कारण सेवा करणाऱ्यांचे कौतुक हे केवळ औपचारिकता नसते ती नव्या नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ज्योत असते जेव्हा समजा एखाद्या सेवेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो तेव्हा त्या थांबेतून अनेक हात सेवेसाठी पुढे येतात अनेकांना त्यातून चांगले कार्य करण्याचे प्रेरणा मिळते केशवस कृती सेवा समूह व जळगाव जनता सहकारी बँक यांच्या माध्यमातून दिला जाणारा डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार दरवर्षी दिला जातो त्यामागील नेमका हेतू हाच होय. समाज परिवर्तनाच्या या दिंडीत सहभागी असणाऱ्यांना पाठबळ व प्रेरणा मिळावी आणि त्यांचे काम समाजापर्यंत यावे या हेतूने पुरस्काराची योजना केली आहे यासह त्यांच्यापासून आपणही काही घेऊ शकतो का? हा विचारही केला जात असतो रविवार 1 मार्च रोजी होणाऱ्या वितरण सोहळ्यात व्यक्तिगत कार्य करणाऱ्या व संस्था स्तरीय पातळीवर पुरस्कार दिला जाणार आहे गत दहा वर्षांपासून अनेक आदर्श व्यक्तिमत्व व संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

यंदा व्यक्तिगत पुरस्कार हा स्वतः बाल कामगारापासून सुरुवात करणाऱ्या ते थेट 11, 500 मुलांना की जे विस्थापित होते त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या कोल्हापूर येथील अवनी फाउंडेशनच्या प्रमुख अनुराधाताई भोसले यांना तर एकीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी असताना दुसरीकडे 17, 500 अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स चे प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या संस्थेचा संस्था स्तरीय पुरस्कार वितरित केला जाणार आहे रविवार दिनांक 1 मार्च रोजी होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा एक माणूसकीचा उत्सव आहे हा सोहळा त्या निशब्द सेवा कार्य करणाऱ्या सर्वांना सलाम करणारा आहे त्यांच्या कष्टांना त्यागाला आणि समर्पणाला हा सन्मान शब्दरूप देतो.

आजच्या स्पर्धात्मक आणि स्वकेंद्रीत होत चाललेल्या काळात केशव स्मृती सेवा समूहासारख्या संस्था समाजाला संवेदनशीलतेची आठवण करून देतात सेवा ही दान नसून कर्तव्य आहे आणि माणुसकीचे हीच खरी ओळख आहे हाच संदेश येथे मिळत असतो हा सोहळा तो क्षण केवळ पुरस्कार वितरण एवढाच मर्यादित नसेल तो अनेकांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणि मनात नव्या सेवेची प्रेरणा जागवणारा ठरेल यात शंका नाही कारण जेथे सेवा आहे. तेथेच खऱ्या अर्थाने समाजाचा श्वास जिवंत राहतो. कुठलाही स्वार्थ न बाळगता कार्य करणाऱ्या या समूहातील प्रत्येक घटकास सलाम….!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---