धुळ्यात मोठी दुर्घटना; उड्डाणपुलावर शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्णतः जळून खाक…!

---Advertisement---

 

धुळे येथे एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. धुळे शहरातील पारोळा चौफुलीवरील उड्डाणपुलावर धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस प्रवासी वाहतूक करत नव्हती. ती ‘पासिंग’ प्रक्रियेसाठी आरटीओ कार्यालयाच्या दिशेने जात होती. त्यामुळे बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून ही बाब सुदैवी मानली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिवशाही बसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत, पाहता पाहता बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळला.

दरम्यान, या आगीमुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्याने वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.

या घटनेमुळे वाहनांच्या तांत्रिक तपासणीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---