---Advertisement---
जळगाव : बंद घराच्या दरवाजाजवळ ठेवलेल्या चावीने भर दिवसा कुलुप उघडत चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मुद्देमालाच्या शोधात चोरट्यांनी सामानाची फेकाफेक केली. कपाटाततील लॉकर उघडुन सोन्याचे दागिने तसेच रोकड असा सुमारे एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा शिक्षिकेचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले. हि घटना शनिवारी (२८ मार्च) सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या सुमारास कोल्हे हित्स परिरसरात शकुंतला हाईटस येथे घडली. भरदिवसा घरात शिरुन चोरी केल्याच्या या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
तृषा चंद्रकांत संन्याशी (वय ३९, रा. प्लॉट नं. ३०१, शकुंतला हाईटस) या शिक्षीका आहेत. त्यांनी सकाळी दहा वाजता दरवाजाला कुलुप लावले. त्यानंतर चावी बाजुला ठेवली होती. महिला रवाना झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराकडे भरदिवसा मोर्चा वळविला. त्यांनी कोणाला दिसणार नाही, अशा ठिकाणी ठेवलेली चावी चोरट्यानी मिळविली. त्याच चावीने कुलुप उघडत दरवाजातून घरात प्रवेश केला.
शिक्षीकेच्या तक्रारीनुसार याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे तपास करीत आहेत.
असा नेला मुद्देमाल
३० हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची चैन, ४५ हजार रुपये किमतचे दीड तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, ७५०० रुपये किमतीचे अडची ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, सहा हजार किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, १२ हजार किमतीचे चार ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, १२ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे लक्ष्मीचे दोन सिक्के, तीन हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, वीस हजार रुपयांची रोकड असा सुमारे एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालावर चोरट्यांनी हात मारला.









