राज्यात १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

---Advertisement---

 

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाने राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. या बदल्यांमध्ये काही महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची महसूल व वन विभागातील आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासह लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी, विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), विनिता वैद्य सिंघल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान व्यवस्थापकीय सचिवपदी, परिमल सिंह यांची कृषी विभागाच्या सचिवपदी, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे संचालक म्हणून, माणिक गुरसळ यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, तर प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे राज्य प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल झाले आहे. )

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---