तळोदा बायपासवर गोवंश घेऊन जाणाऱ्या होंडा सिटीचा अपघात; चालकासह दोघे फरार

---Advertisement---

 

३ एप्रिल रोजी तळोदा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरे घेऊन जाणारी होंडा सिटी (MH01VA5741) ही कार तळोदा बायपासवर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. या अपघातानंतर कारमधील चालक आणि त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले.

अक्कलकुव्याकडून तळोदाच्या दिशेने ही कार येत होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये दोन मोठी आणि दोन लहान अशी एकूण चार गोवंश जनावरे असल्याचे उघड झाले. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका व्यक्तीने ही कार वेगात येताना पाहताच ओरडून इशारा दिला, मात्र त्यानंतर चालकाने वाहन सोडून तातडीने पलायन केल्याची माहिती समोर आली. जवळील विटभट्टी चालक प्रजापती यांनी घडलेला प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील जनावरांना सुरक्षितपणे रांझणी येथील गोशाळेत हलविण्यात आले. तसेच अपघातग्रस्त कार जप्त करून ती पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास तळोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---