---Advertisement---
जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत विधानपरिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीला सुरूवात झाली असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची शासकीय वाहने प्रशासनाकडे मंगळवारी सुपूर्द केली. महिनाभर ही वाहने प्रशासनाच्याच ताब्यात राहणार असल्याने पदाधिकाऱ्यांना आता खासगी वाहन वापरावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यात विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शहर कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापौर, उपमहापौर, सभापतींचे वाहन जमा आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्यानंतर महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची शासकीय वाहने प्रशासनाने जमा करून घेतली आहेत.
जळगाव शहरातील राजकीय बॅनर्स, होडींग्ज हटविले जाणार आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरात जे राजकीय बॅनर्स, होडींग्ज लावण्यात आले असतील ते त्वरीत हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. २०० कोटींच्या प्रस्तावांना ब्रेक
शहरातील रस्ते, गटारी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी विविध नगरसेवकांकडून तब्बल २०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. आता महिन्याभर आचारसंहिता लागू झाली.
परिणामी, आता पुढील महिनाभर या नव्या कामांना कोणतीही मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे शहरात नव्याने सुरू होऊ पाहणाऱ्या विकासकामांना मोठी खीळ बसली आहे. ज्या विकासकामांना आचारसंहिता लागण्यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे, त्या कामांना अडथळा नसणार आहे.









