पशुपालनासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब गरजेचा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

---Advertisement---

 

पशूपालन हा खानदेशातील अत्यंत महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय आहे. निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारल्यास निश्चितच यश येते. पशूपालन करताना काही शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
​पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात बुधवार, दिनांक २० मे रोजी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
​याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


​पशुवैद्यकीय दवाखाने अत्याधुनिक करणार : जिल्हाधिकारी
​यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात विविध योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. पशूपालन हा अत्यंत अवघड व्यवसाय असून, याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागात समृद्ध शेती केली जाते, त्यामुळे जिल्ह्यात पशुपालनाला पोषक वातावरण आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून शेळी, मेंढी व कुक्कुटपालनासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्व पशुवैद्यकीय दवाखाने अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तळागाळातील पशूपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


​पशूपालनाला उद्योगाचा दर्जा मिळणार : करिश्मा नायर
​जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर म्हणाल्या की, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना प्रकाशझोतात आणण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. या कार्यशाळेमुळे पशूपालनाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी विशेष मदत होणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
​’पशुधन वार्ता’ मासिकाचे विमोचन:
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘पशुधन वार्ता’ या त्रैमासिक/मासिकाचे मोठ्या उत्साहात विमोचन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---