---Advertisement---
मुंबई (८ एप्रिल २०२६) – सुषमा अंधारे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. नेमके काय झाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला त्या अनुपस्थित राहणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.









