वाढदिवसाला न बोलावल्याने तरुणाचे टोकाचे पाऊल; अंबाजोगाई तालुक्यात खळबळ

---Advertisement---

 

बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावले नाही, या कारणावरून नैराश्यात गेलेल्या २४ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


मृत तरुणाचे नाव महेश उद्धव भणगे असे असून, त्याने राहत्या घरीच विषारी द्रव्य प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले. काही दिवसांपासून मित्रांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपासून दूर ठेवल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.


माहितीनुसार, सोमवारी (६ एप्रिल) त्याच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस होता. मात्र, महेशला या सेलिब्रेशनला बोलावण्यात आले नव्हते. यामुळे तो खूपच खचला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.


महेश दुपारच्या सुमारास घराच्या छतावर गेला होता. बराच वेळ खाली न आल्याने कुटुंबीयांनी रात्री सुमारे ८ वाजता छतावर जाऊन पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. तत्काळ त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.


आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---