भाजीत केस निघाल्याच्या रागातून पतीने पत्नीला बेदम मारलं; छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने संपवलं आयुष्य….!

---Advertisement---

 

पती जेवायला बसला पत्नीने त्याला जेवण वाढलं, मात्र भाजीत केस निघाला याचा राग आल्याने नवऱ्याचा संताप अनावर झाला आणि पत्नीला जबर मारहाण केली या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुरा भागात श्रावस्ती कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती जेवायला बसला आणि भाजीत केस निघाला म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिला गंभीर जखमी केल आहे. यासह सासरच्या जाचाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली व आयुष्य हे संपवलं. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईश्वरी अजय बनकर (वय 25) राहणार छत्रपती संभाजीनगर असं मृत विवाहितेचे नाव असून अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर आरोपी असलेले सासरच्या सात जणांची नाव आहेत.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतविवाहिता ईश्वरीचा विवाह अजय बनकर याच्यासोबत 28 जून 2020 रोजी झाला होता. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत अजय बनकर हा घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे. दरम्यान या दोघांच्या लग्नावेळी मृत विवाहिता ईश्वरीच्या वडिलांनी 5 तोळे सोनं, 2 लाख रुपये रोख आणि सर्व घरगुती साहित्य हे दिलं होतं. तरीही आरोपी पती अजय याने त्याच्या नावावर घेतलेल्या प्लॉटचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून पैशांची अपेक्षा केली होती आणि यासाठी तो मृत ईश्वरीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेच्या रात्री काय घडलं ?

दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सुमारास आरोपी पती अजय हा जेवायला बसला ईश्वरीने त्याला जेवण वाढलं मात्र जेवत असताना भाजीमध्ये केस सापडला यावरून अजयला संताप अनावर झाला आणि त्याच वेळी ईश्वरीला त्याने जबर दुखापत होईल तिथपर्यंत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या दिवशी 7 एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा वाद घातला आणि ईश्वरीवर गंभीर आरोप केले आणि तिचा छळ केला. यासह सासरच्या इतर नातेवाईकांनीही तिला सतत टोमणे मारले आणि हा त्रास तिला असह्य झाल्याने ईश्वरीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन तिचं जीवन संपवलं.

ईश्वरीच्या मृत्यूची बातमी कळताच ईश्वरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मोठा संताप व्यक्त केला. सासरच्या लोकांवर कारवाई होणार नाही. तोपर्यंत आम्ही ईश्वरीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्र त्यांनी त्यावेळी घेतला. घटनेची गांभीर्यता ओळखून छावणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीसह सासरच्या सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

सासरच्या या सर्व सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हुंडा आणि सोने-चांदीचे दागिने दिल्यानंतरही एका मुलीला आपला जीव गमावावा लागल्याने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात घटनेने हळहळ व्यक्त केले जात असून संताप ही व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---