---Advertisement---
एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून गॅस बुकिंगसंदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले असून, आता सर्व ग्राहकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या नवीन नियमांनुसार, ज्या ग्राहकांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांना गॅस बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. तर काहींची गॅस बुकिंग देखील थांबवली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी e-kyc ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बोगस गॅस कनेक्शनवरजी नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अनेक भागात एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त LPG चे गॅस कनेक्शन असल्याचे तसेच घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी होत असल्याचे प्रकार समोर आले होते. या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलेंडर वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
गॅस बुकिंग साठी लागणारी e-KYC प्रक्रिया अतिशय सोपी असून ग्राहकांना ती विविध मार्गांनी पूर्ण करता येते. ग्राहकांनी जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आधार क्रमांक देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. तसेच संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर लॉग इन करूनही आधार लिंक करता येते आणि ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करता येते. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण टाळण्यासाठी ग्राहकांनी तातडीने e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.









