---Advertisement---
मन्यारखेडा येथे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या विश्वातील एकमेव ‘ग्रह राशी नक्षत्र मंदिर’ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली. २८ मार्चपासून सुरू झालेल्या या भव्य सोहळ्याची पूर्णाहुती श्री बदरीनाथ मंदिर संस्थानचे गादीपती प. पू. स. गु. श्री मयूरगोविंदजी महाराज यांच्या रसाळ काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना महाराजांनी ग्रह, राशी आणि नक्षत्रांचे मानवी जीवनातील महत्त्व आणि आध्यात्मिक अधिष्ठान यावर प्रकाश टाकला. ‘हे मंदिर केवळ दगड-विटांची वास्तू नसून विश्वाच्या ऊर्जेचे केंद्र आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यासह परगावाहून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.









