घरात ‘या’ प्राण्यांचे फोटो लावू नका; वाद आणि तणाव वाढू शकतो…!

---Advertisement---

 

आपण घरात सजावट करताना अनेक आकर्षक अशा पेंटिंग्स लावतो, फोटो प्रेम लावतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार योग्य चित्रांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चुकीची पेंटिंग घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते, असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

वास्तुनुसार सात धावत्या घोड्यांचे चित्र घरात लावणे शुभ मानले जाते. हे चित्र प्रगती, यश आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. मात्र हे घोडे आक्रमक नसून शांत आणि संतुलित मुद्रेतील असावेत, असेही सांगितले जाते.

याउलट, घरात हिंस्त्र किंवा शिकार करणाऱ्या प्राण्यांची चित्रे लावणे टाळावे. अशा चित्रांमुळे घरात वाद, तणाव आणि नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, असे मानले जाते. तसेच पेंटिंगची पार्श्वभूमीही महत्त्वाची असते. वादळ, गोंधळ किंवा भीतीदायक दृश्ये टाळून शांत आणि निसर्गरम्य चित्रे लावणे अधिक योग्य ठरते.

काही ठराविक दिशेनुसारही चित्र लावणे फायदेशीर मानले जाते. उत्तर किंवा पूर्व दिशेला सकारात्मक ऊर्जा देणारी चित्रे लावल्यास आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धी वाढते, असा विश्वास आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती सामान्य समजुती आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित असून, अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही.)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---