जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग; मुख्य रस्त्यांवर पांढऱ्या-पिवळ्या पट्ट्यांचे काम सुरू

---Advertisement---

 

शहराला शिस्तबद्ध व आकर्षक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने शहरातील मुख्य रस्त्यांवर पांढरे व पिवळे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग) टाकण्याच्या कामाला रविवारी (१२ एप्रिल) रात्रीपासून सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात शिवतीर्थ चौक ते आकाशवाणी चौक या प्रमुख मार्गावर पट्टे टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले. सोमवारी सकाळी या मार्गाचे बदललेले रूप नागरिकांच्या नजरेत भरले.


कामाची पाहणी करण्यासाठी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता रस्ते मार्किंगची गरज निर्माण झाली होती. महापौरांनी गेल्या काही काळापासून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पट्ट्यांमुळे वाहनचालकांना योग्य लेनची जाणीव होऊन वाहतुकीत शिस्त येण्यास मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---